

AAP defeat Delhi elections
ESakal
आम आदमी पार्टी सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेल्या राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी शनिवारी 'आप'वर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील 'आप'च्या पराभवाबाबत एक महत्त्वपूर्ण खुलासाही केला. राघव चड्ढा यांच्या मते, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील 'आप'च्या पराभवामागील सर्वात मोठ्या कारणांपैकी एक म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा प्रसिद्ध आलिशान बंगला होता.