

TRAI Recharge Update
Esakal
देशातील कोट्यवधी मोबाइल ग्राहकांसाठी प्रीपेड रिचार्जबाबत TRAI ने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. टेलिकम्युनिकेशन कंपन्यांना आता ३० दिवसांची वैधता असलेले आणि इंटरनेट डेटाची गरज नसलेल्यांना फक्त एसएमएस-कॉलिंगचे प्लॅन उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारचे आभार मानलेत. तसंच आपल्या मागण्या मान्य केल्याचं म्हटलंय.