भारतीय वंशाच्या गुन्हेगाराला प्रथमच देहदंड 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये गुन्हेगार ठरलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला फाशी देण्यात येणार आहे. रघुनंदन यंदमुरी(32) असे या गुन्हेगाराचे नाव असून, भारतीय वंशाच्या आजी-नातीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. स्थानिक प्रशासनाकडून 23 फेब्रुवारी 2018 रोजी त्याला फाशी देण्यात येणार आहे

रघुनंदनने 61 वर्षीय सत्यवती वीणा यांच्यासह सान्वी या त्यांच्या 10 महिन्यांच्या नातीचे अपहरण करुन हत्या केली होती. 2014मध्ये खंडणीसाठी त्याने अपहरण आणि हत्या केल्याचे सिद्ध झाल्यावर त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेविरोधात त्याने कोर्टात धाव घेतली होती, मात्र एप्रिलमध्ये तो केस हरला.

पेन्सिल्वेनियाचे गव्हर्नर टॉम वुल्फ यांनी 2015मध्ये रघुनंदनच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे रघुनंदनच्या फाशीला स्थगिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेन्सिल्वेनियामध्ये गेल्या 20वर्षात एकही मृत्यूदंड झालेला नाही. 

आंध्र प्रदेशचा रहिवासी असलेला यंदमुरी एच-1बी व्हिसावर अमेरिकेला आला होता. इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये त्याने पदवी मिळविली होती.

Web Title: Raghunandan Yandamuri, First Indian-origin Death-row Prisoner in US, to be Executed on February 23