
Rahul Gandhi absent at CP Radhakrishnan’s Vice Presidential oath ceremony sparks political debate.
esakal
Why Rahul Gandhi skipped CP Radhakrishnan oath ceremony: सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी देशाच्या १७व्या उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद अन् गोपीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनात आयोजित या खास समारंभात पीएम मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, हमीद अन्सारी आणि जगदीप धनखड यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. परंतु या महत्वपूर्ण सोहळ्यास लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी हजर नव्हते.
राहुल गांधींनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी आज गुजरात दौऱ्यावर जात आहेत. जिथे ते पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. यामुळे ते या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत.
भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत म्हटले की, राहुल गांधी भारतीय संविधानाचा द्वेष करतात. राहुल गांधी भारतीय लोकशाहीचा द्वेष करतात. राहुल गांधींनी उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याचा बहिष्कार केला. काही दिवस आधी त्यांनी लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्य उत्सवाचा बहिष्कार केला होता.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाचा आणि संवैधानिक मान्यवराच्या शपथविधी समारंभाचा तिरस्कार करणारा व्यक्ती सार्वजनिक जीवनात राहण्यास पात्र असू शकतो का? राहुल गांधींना मलेशियात सुट्टी घालवण्यासाठी वेळ आहे, पण अधिकृत संवैधानिक समारंभाला उपस्थित राहण्यासाठी नाही! राहुल गांधी हे भारताच्या लोकशाहीसाठी धोकादायक आहेत!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.