Rahul Gandhi’s Allegation Against PM Modiesakal
देश
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर मोदी गप्प का? 'अदानींच्या चौकशीमुळे पंतप्रधानांचे बांधलेत हात'; राहुल गांधींचा गंभीर आरोप
Rahul Gandhi’s Allegation Against PM Modi : मोदींना 'AA' (अंबानी-अदानी) आणि रशियन तेल करारांशी संबंधित आर्थिक व्यवहार उघडकीस होण्याची भीती आहे. त्यामुळेच पंतप्रधानांचे हात बांधले गेले आहेत.
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र शब्दांत टीका केलीये. त्यांनी आरोप केला की, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या उपस्थितीत मोदी ठाम भूमिका घेऊ शकले नाहीत. यामागे उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरुद्ध अमेरिकेत सुरू असलेली चौकशी कारणीभूत आहे.'
