विरोधकांची बस पाहून भाजपच्या टेन्शनमध्ये वाढ

वृत्तसंस्था
सोमवार, 17 डिसेंबर 2018

राहुल गांधी यांनी राज्यस्थानहून निघताना एक ट्विट करत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचं त्यांनी अभिनंदन केले. यामध्ये ते विरोधी पक्षांच्या नेत्यांना घेऊन प्रवास करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या ट्विटला सोशल मीडियात चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधीवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. विरोधी पक्षांसोबत राहुल गांधींना फोटोमध्ये पाहणे भाजपला विचलीत करु शकत असेही ट्विटरवर प्रतिक्रिया आहेत.

जयपूर : मध्य प्रदेश, राज्यस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणूकीत विजय मिळाल्यानंतर काँग्रेसने आज (सोमवार) तिन्ही राज्यांतील शपथविधीच्या कार्यक्रमात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमासाठी सर्व विरोधक एकाच बसमधून आल्याने भाजपसाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे.

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस जिंकल्यानंतर आज राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नवे सरकार स्थापन होत आहे. या तीन राज्यांमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महाआघाडीतील नेत्यांसोबत हजेरी लावली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी सकाळी शपथ घेतली. यानंतर दुपारी मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देखील राहुल गांधी आणि संपूर्ण महाआघाडीच्या उपस्थितीत शपथ घेतली. तर आता थोड्याच वेळात छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे देखील  मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

राहुल गांधी यांनी राज्यस्थानहून निघताना एक ट्विट करत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचं त्यांनी अभिनंदन केले. यामध्ये ते विरोधी पक्षांच्या नेत्यांना घेऊन प्रवास करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या ट्विटला सोशल मीडियात चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधीवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. विरोधी पक्षांसोबत राहुल गांधींना फोटोमध्ये पाहणे भाजपला विचलीत करु शकत असेही ट्विटरवर प्रतिक्रिया आहेत. या बसमध्ये राहुल गांधी यांच्या शेजारी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शरद यादव, स्टॅलिन, कुमारस्वामी, फारूक अब्दुल्ला आदी प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, यामध्ये मायवती, अखिलेश यादव आणि ममता बॅनर्जी यांची अनुपस्थिती होती.

Web Title: Rahul Gandhi and all opposition leaders attend rajasthan oath taking ceremony