राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट पुन्हा झाले हॅक

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे अधिकृत ट्विटर हॅंडल पुन्हा एकदा हॅक झाले. एवढेच नाही, तर कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत हॅंडलही हॅक झाल्याचे समोर येत आहे.

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे अधिकृत ट्विटर हॅंडल पुन्हा एकदा हॅक झाले. एवढेच नाही, तर कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत हॅंडलही हॅक झाल्याचे समोर येत आहे.

राहुल यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून काल शिवीगाळ करणारे ट्‌विट्‌स करण्यात आले होते. राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी यात अश्‍लील भाषा वापरण्यात आली होती. यापैकी काही ट्‌विट्‌स लगेचच काढून टाकण्यात आली. पण त्यानंतर हॅकर्सने राहुल गांधी यांच्या अकाऊंटमधील 'प्रोफाईल इन्फॉर्मेशन'ही बदलली. या हॅकर्सच्या विरोधात कॉंग्रेसने दिल्ली पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली आहे. राहुल गांधी स्वत: ट्‌विटर अकाऊंट वापरत नाहीत. त्यांच्या कार्यालयाद्वारे हे ट्‌विटर अकाऊंट चालविले जाते.

यानंतर कॉंग्रेसचे ट्विटर अकाऊंटही हॅक झाल्याचे निदर्शनास आले. दिल्ली पोलिसांचा सायबर विभाग आणि कॉंग्रेसचा आयटी विभाग या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.

दरम्यान, या घटनेचा उल्लेख करत कॉंग्रेसने 'डिजिटल इंडिया' या उपक्रमावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. 'डिजिटल विश्‍वात प्रवेश करताना नागरिकांची संवेदनशील माहिती कितपत गोपनीय राखली जाऊ शकते, हा मोठाच प्रश्‍न आहे. यातून देशामध्ये हुकूमशाही प्रवृत्ती वाढीस लागल्याचे दिसून येते. अशा विकृत गोष्टींमुळे राहुल गांधी यांचा आवाज दडपता येणार नाही. कोट्यवधी युझर्स असलेल्या व्यासपीठावरील माहिती सुरक्षित राहत नसेल, तर देशातील सर्व नागरिकांची माहिती कशी सुरक्षित राखली जाऊ शकेल?' असा प्रश्‍न कॉंग्रसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला.

Web Title: Rahul Gandhi and Indian National Congress' Twitter accounts hacked