जेव्हा राहुल गांधी आणि गडकरींमध्ये गप्पा रंगतात

 जेव्हा राहुल गांधी आणि गडकरींमध्ये गप्पा रंगतात

नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमधील राजपथावर होणारी परेड ही कायमच चर्चेत असते. तशीच ती कालही (ता.26) राहिली. कारण, सत्ताधारी पक्षातले मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या कार्यक्रमाला शेजारी शेजारी बसले होते. या दोघांमध्ये मनसोक्त गप्पा झाल्या. लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच या दोन नेत्यांना एकत्र गप्पा मारताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसला.

राजपथावरच्या संचलनासाठी आणि परेडसाठी नितीन गडकरी पत्नीसह कार्यक्रमाला हजर राहिले होते. त्यांच्या शेजारी बसलेली दुसरी व्यक्ती म्हणजे राहुल गांधी हे होते. परेड पहात असतानाच या दोघांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या. आता हे दोन नेते शेजारी बसून गप्पा मारत असल्याने चर्चांना उधाण आले होते. राफेल कराराच्या मुद्द्यावरून राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारत आहेत. इतकंच नाही तर बेरोजगारी, गरीबी, शेतकऱ्यांचे प्रश्न यासंदर्भातही राहुल गांधी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत आहेत. त्यांच्यावर रोज टीका करत आहेत. दररोज हे घडत असताना 26 जानेवारीच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या परेडमध्ये गडकरी आणि राहुल गांधी हे नेमकं काय बोलत असतील या बाबतीत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुका मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहेत त्यानंतर काय होणार याचा अंदाज अजून तरी आलेला नाही. मात्र, नितीन गडकरी हे त्यांच्या कामामुळे ओळखले जातात. त्यांचा काम करण्याचा धडाका विलक्षण आहे. आता अशा गडकरींशी राहुल गांधी यांनी नेमक्या काय गप्पा मारल्या? त्यांच्यात काय विषय होते या सगळ्याची चर्चा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com