राहुल गांधी आज बेंगळुरु कोर्टासमोर होणार हजर; मानहानीचा खटला नेमका काय आहे?

Congress leader Rahul Gandhi reaches airport:: काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज बेंगळुरुच्या विशेष कोर्टात हजर होणार आहेत. मानहानीच्या खटल्यात त्यांना कोर्टाने सात जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
rahul gandhi
rahul gandhi

बेंगळुरु- काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज बेंगळुरुच्या विशेष कोर्टात हजर होणार आहेत. मानहानीच्या खटल्यात त्यांना कोर्टाने सात जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राहुल गांधी हे आज बेंगळुरुच्या एअरपोर्टवर आल्याचं पाहायला मिळालं. सकाळी साडेदहा वाजता ते कोर्टात हजर राहतील.

कर्नाटक भारतीय जनता पक्षाने मानहानीप्रकरणात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मुख्य धारेतील वृत्तपत्रांमध्ये मानहानी करणारी जाहीरात छापल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हा खटला दाखल करण्यात आला होता. २०२३ पूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी ही जाहीरात छापण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

राहुल गांधी कोर्टाच्या सुनावणीसाठी कर्नाटकाला आले असले तरी ते इथे काँग्रेसच्या नव्या खासदारांची आणि पराभूत खासदारांची भारत जोडो भवनमध्ये भेट घेतील. मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे देखील यावेळी उपस्थित असतील. काँग्रेसच्या राज्य युनिटने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

rahul gandhi
Rahul Gandhi on Stock Market : "खोटे एक्झिट पोल दाखवायला सांगून मोदींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सांगितली"; राहुल गांधींचा गंभीर आरोप

मानहानीचा खटला नेमका काय आहे?

भाजप सरकारने २०१९ चे २०२३ काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसच्या जाहिरातीमधून करण्यात आला होता. याप्रकरणी भाजपने जून २०२३ मध्ये तक्रार दाखल केली होती. काँग्रेसकडून करण्यात आलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. ५ मे रोजी कर्नाटकच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

rahul gandhi
Kiran Mane: "राहुल-प्रियांका या दोघांनी आईच्या चेहर्‍यावरचं हरवलेलं हसू परत आणलं"; किरण मानेंनी शेअर केलेल्या व्हिडीओनं वेधलं लक्ष

'भ्रष्टाचाराचे रेट कार्ड' या शिर्षकाखाली ही जाहिरात करण्यात आली होती. भाजपच्या बोम्मई सरकारला ४० टक्के कमिशन सरकार म्हणून हिणवण्यात आलं होतं. तक्रारीमध्ये असं म्हणण्यात आलं होतं की, राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ही जाहिरात दिली. शिवाय, राहुल गांधी यांनी ही जाहिरात आपल्या सोशल मिडिया हँडलवर शेअर केली होती.

१ जून रोजी सिद्दरामय्या आणि डीके शिवकुमार कोर्टासमोर हजर झाले होते. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. कोर्टाने राहुल गांधी यांना ७ जून रोजी हजर होण्याचे आदेश दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com