
'विज्ञान खोटे बोलत नाही, पण...' कोरोना मृत्यूवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल
नवी दिल्ली : भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४७ लाख आहे, असा दावा जागितक आरोग्य संघटनेने (WHO Corona Death Toll Report) केला आहे. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. विज्ञान खोटे बोलत नाही. पण, पंतप्रधान मोदी खोटं बोलतात, असं राहुल गांधी म्हणाले. तसेच कोरोना काळात मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना मदत करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
हेही वाचा: WHO च्या कोरोना मृत्यूच्या आकडेवारीवर भारताचा आक्षेप, म्हणतात...
कोरोना महामारीमुळे ४७ लाख भारतीयांचा मृत्यू झाला. सरकारने ४.८ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले. पण, ही खोटी आकडेवारी आहे. विज्ञान खोटे बोलत नाही, पण मोदी खोटं बोलतात, असा निशाणा राहुल गाधींनी मोदी सरकारवर साधला. पुढे ते म्हणातात, ज्यांनी कोरोना काळात आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले आहे त्यांचा विचार करा. त्यांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये नुकसानभरपाई द्या, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावर भारताचा आक्षेप -
भारतात तब्बल ४७ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे भारत सरकारने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीच्या १० पट आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. त्यांनी १७ राज्यातील आकडेवारी जारी केली आहे. पण, जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी खोटी असल्याचं मोदी सरकारने म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने डेटा कुठून मिळवला आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी कोणती पद्धती वापरली, हे आम्हाला सांगावं, असं सरकारने म्हटलं आहे. आमचा यावर आक्षेप असून आम्ही योग्य ठिकाणी आमचं मत मांडू, असंही सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
Web Title: Rahul Gandhi Attack Modi Government Who Corona Death Toll Report
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..