
नवी दिल्ली : चिनी घुसखोरी आणि अमेरिकेची शुल्क आकारणी या मुद्द्यांवर लोकसभेमध्ये आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजपदरम्यान खडाजंगी झाली. चीनने चार हजार चौरस किलोमीटर भारताचा भूभाग बळकावला असून अमेरिकेने लादलेले शुल्क भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्णतः उध्वस्त करणारे आहे. याबाबत केंद्र सरकार काय करत आहे, असा सवाल राहुल गांधींनी केला. यावर भाजपने, काँग्रेसच्याच राजवटीत चीनने अक्साई चीनवर ताबा मिळविल्याचा दावा केला.