Rahul Gandhi Targets PM Modi Over Melody Chocolate Video
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. भेटीदरम्यान मोदींनी मेलोनी यांना ‘मेलोडी’ चॉकलेट भेट दिलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत बोलताना मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली. “देश आर्थिक संकटाचा सामना करत असताना पंतप्रधान मोदी इटलीत जाऊन चॉकलेट वाटत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.