
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आणि शेतकऱ्यांचे समर्थन करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे
नवी दिल्ली- केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आणि शेतकऱ्यांचे समर्थन करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत एकजूटता दाखवत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज दिल्लीचे उप-राज्यपाल अनिल बैजल यांच्या घराबाहेर निदर्शन केले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राम मंदिरासाठी दिला निधी; चेक केला सुपूर्द
कृषी कायद्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या चार सदस्यांच्या समितीपैकी एकाने राजीनामा दिला आहे. या मुद्द्यावर राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला होता. ते म्हणाले की, "तुम्ही माया शब्द ऐकला आहे का? हे सर्व माया आहे, मीडियाने निर्माण केलेली माया आहे आणि ही माया तुटणार आहे. ज्या दिवशी ही माया तुटली त्यादिवशी बघा काय होतं ते?"
केंद्राच्या कृषी कायद्यांना काळे कायदे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकावर टीका केली. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, असं वातावरण माध्यमांनी तयार केलं आहे. पण ही मोह माया लवकरच तुटेल, असं ते म्हणाले आहेत. काँग्रेस आज 'किसान अधिकार' अभियानाअंतर्गत आंदोलन करत आहे. काँग्रेसने राज्यातील काँग्रेस कमेटीला आपापल्या राज्यात राजभवनाभोवती निदर्शने करण्यास सांगितलं आहे.
धनंजय मुंडे राजीनामा प्रकरण: शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
भाजप सरकारला कायदे रद्द करावेच लागतील. जोपर्यंत हे कायदे मागे घेतले नाहीत, तोपर्यंत काँग्रेस मागे घटणार नाही. मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून त्यांना संपवण्याचे कारस्थान आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. देशाचे अन्नदाता आपल्या अधिकारांसाठी अहंकारी मोदी सरकारविरोधात सत्याग्रह करत आहेत. आज संपूर्ण भारत शेतकरी अत्याचार आणि वाढते पेट्रोल-डिझेलचे दर याविरोधात आपला आवाज उठवत आहे, असंही ते म्हणाले.