Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या मोटारीवर दगडफेक; काँग्रेसचा स्थानिक प्रशासनावर ठपका

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली.
stone attack on rahul gandhi motor
stone attack on rahul gandhi motorkal

कोलकता - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली. अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीमध्ये राहुल गांधी यांच्या मोटारीची मागील काच फुटल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याप्रकरणी काँग्रेसने स्थानिक प्रशासनावर ठपका ठेवला आहे.

या दगडफेकीमध्ये सुदैवाने राहुल गांधी यांना इजा झाली नाही. दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा हल्ला बंगालमध्ये नाही तर बिहारमध्ये झाल्याचे म्हटले आहे. राहुल यांच्या मोटारीवरील हल्ल्याचा ममता बॅनर्जी यांनी निषेध केला. त्या म्हणाल्या, ‘राहुल यांच्या मोटारीवर दगडफेक झाल्याचे कळताच मी आधी त्या घटनेची सविस्तर माहिती घेतली.

ही घटना बिहारच्या कटिहारमध्ये घडली असून ती बंगालमध्ये घडलेली नाही. ज्यावेळी राहुल यांच्या मोटारीने बंगालमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्या मोटारीची मागील काच ही फुटलेली होती. मी या हल्ल्याचा निषेध करते.’ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी म्हणाले की, ‘राहुल यांची यात्रा माल्डा जिल्ह्यामध्ये आली असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मोटारीवर दगडफेक केली.’

यात्रा थांबणार नाही - रमेश

‘राहुल यांची यात्रा मणिपूर, आसाम, मेघालय, बिहारमधून आणि आता पश्चिम बंगालमध्ये पोचली असून या राज्यांत काँग्रेस सत्तेवर नाही. अनेक ठिकाणी त्या यात्रेचे पोस्टर फाडण्यात आले तर काही ठिकाणी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता तर त्यांच्या गाडीची काचही फोडण्यात आली. काहीही झाले तरी आमची यात्रा थांबणार नाही. ती तशीच सुरू राहील,’ असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com