
Rahul Gandhi Parliament Speech Marathi News : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत चर्चेदरम्यान विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आज जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन UPA आणि NDA या दोन्ही सरकारांवर निशाणा साधला. त्याचबरोबर मोदी सरकारच्या कार्यकाळात आणलेल्या काही योजनांचं त्यांनी यावेळी कौतुकही केलं.