राहुल गांधी कर्नाटकात जिंकू शकत नाहीत : येडियुरप्पा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

कर्नाटक राज्यातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडून येऊ शकत नाहीत, असे कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

हुबळी: कर्नाटक राज्यातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी निवडून येऊ शकत नाहीत, असे कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

बिदर लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी उभे राहणार असल्याची चर्चा जोर सध्या जोर धरत आहे. या चर्चेचा उल्लेख करत येडियुरप्पा म्हणाले, की त्यांनी कर्नाटकातील कोणत्याही मतदारसंघातून उभे राहावे, ते जिंकू शकणार नाहीत. कारण कर्नाटकच्या लोकांना त्यांची कार्यक्षमता आणि पद्धत ठाऊक आहे. 

त्याचचबरोर, ते अमेठीतून जरी निवडणुक लढले तरी ते तेथून निवडून येणार नाहीत, कारण तेथे त्यांनी कोणतेच काम केलेले नाही. हे त्यांना माहीत असल्यानेच ते कदाचित दुसरा सुरक्षित असा मतदारसंघ शोधत असतील परंतु, त्यांना कर्नाटकात तरी कुठलाच सुरक्षित मतदार संघ नसल्याचे येदियुरप्पा यांनी म्हटले आहे.

Web Title: Rahul Gandhi can not win Karnataka says Yeddyurappa