राहुल गांधी म्हणाले, माझं रक्त खवळतंय अन् मी अस्वस्थही झालोय!

सुशांत जाधव
Monday, 27 July 2020

मोदीजी तुमचे सरकार कमजोर आहे. चिनी सैन्याच्या घुसखोरीमुळं रक्त खवळत असून मी अस्वस्थ झालोय, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: चीन घुसखोरी केल्याच्या मुद्यावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. चिनी सैन्य भारत भूमीत घुसले आहे. हे मला माहित असताना मी देशवासियांशी खोट बोलणार नाही. एखादा देश आपल्या भूमीत कसा काय घुसखोरी करु शकतो? असा प्रश्न उपस्थिती करत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदीजी तुमचे सरकार कमजोर आहे. चिनी सैन्याच्या घुसखोरीमुळं रक्त खवळत असून मी अस्वस्थ झालोय, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. 

अग्रलेख : आर्थिक सुधारणांचे मैदान

चीनी लष्कराने भारताच्या भूमीवर ताबा घेतला असूनही मोदी सरकार जनतेला अंधारात ठेवत आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केलाय. त्यांच्या या व्हिडिओला भाजप कसे उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एक भारतीय या नात्याने देशा आणि देशातील जनता यांची सुरक्षा ही माझी प्राथमिकता आहे. चिनी आपल्या प्रदेशात घुससल्याचे स्पष्ट दिसते आहे. सेटलाइट फोटोतून चीनच्या कुरापती उघडपणे दिसत असताना मोदी सरकार ही गोष्ट मान्य करायला तयार नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला दोन देशातील तणावजन्य परिस्थितीत मी अनेक माजी लष्कर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सेटलाइट फोटोवरुन चीनने काही भागात ताबा घेतल्याचे स्पष्ट पाहिले. त्यानंतरही जनतेशी खोटे बोलणे जमणार नाही. याविषयी बोलल्यामुळे माझी कारकिर्दी धोक्यात आली तरी मी गप्प बसणार नाही, अशा शब्दांत भारत-चीन यांच्यातील तणावपूर्ण परिस्थीवर राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केलाय. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात 20 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील तणाव टोकाला गेल्याचे समोर आले. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी सैन्याने भारताच्या कोणत्याही भागात कब्जा केला नसल्याचे म्हटले होते. या विधानानंतर मोदींनी लेह-लदाखचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. चीनचे नाव न घेता विस्तारवादाची भूमिका खपवून घेणार नसल्याचा इशारा यावेळी मोदींनी चीनला दिला होता. याशिवाय भारत सरकारने चीनमधील भारतातील कंपन्यांनाही दणका दिल्याचे पाहायला मिळाले. सीमाभागातील वाढता तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशातील उच्च स्तरीय लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सत्रे रंगली. त्यानंतर चीनने सैन्य मागे घेतल्याच्या बातम्याही झळकल्या. एका भागातून चीन सैन्य मागे सरकल्यानंतर दुसऱ्या भागात त्यांच्या हालचाली सुरुच असल्याच्या बातम्याही ऐकायला मिळत आहेत.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi on china dont mind if my career goes to hell wont lie and Target PM Narendra Modi