Rahul Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना राहुल गांधींचा ‘फ्लाइंग किस’

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhisakal

शाजापूर (मध्यप्रदेश) - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मध्यप्रदेशात या यात्रेला अपेक्षेप्रमाणे विरोध होताना दिसतो. परंतु, राहुल हे देखील टीकाकारांवर संतापून न जाता प्रेमाने त्यांच्याशी संवाद साधताना दिसून आले.

भाजप कार्यकर्त्यांनी आज शाजापूरमध्येही ‘मोदी- मोदी’च्या नामघोषात त्यांचे स्वागत केले खरे पण राहुल यांनीही आपली यात्रा ‘मोहब्बत की दुकान’ असल्याचे दाखवून देत कार्यकर्त्यांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी दिलेला ‘फ्लाइंग किस’ देखील चर्चेचा विषय ठरला.

राहुल यांच्या यात्रेने शनिवारी दुपारी मध्यप्रदेशात प्रवेश केला होता, शाजापूरमधून त्यांच्या वाहनांचा ताफा पुढे जात असताना रस्त्याच्या दुतर्फा भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. येथील ए.बी. रोडवर भाजप नेते मुकेश दुबे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काही कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते.

मोदींच्या नावाच्या घोषणा ऐकून राहुल गांधी यांनी त्यांच्या वाहनाचा ताफा थांबविला. त्यांनी थेट गाडीतून उतरून भाजप कार्यकर्त्यांची भेट घेतल्याने ते कार्यकर्तेही अवाक् झाले होते. राहुल कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना काहीजणांनी जय श्रीरामच्याही घोषणा दिल्या.

बटाट्यांच्या भेटीचा स्वीकार

राहुल हे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना काहीजणांनी त्यांना बटाटे भेट म्हणून दिले. राहुल यांनीही भाजप कार्यकर्त्यांच्या या भेटीचा प्रेमपूर्वक स्वीकार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com