
UPSC च्या नवीन अध्यक्षांच्या नियुक्तीवर राहुल गांधींचा सवाल, म्हणाले...
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या चेअरमनपदी केंद्र सरकारकडून मनोज सोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सोनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित असल्यानं राहुल गांधी यांनी युपीएससीला (UPSC) "यूनियन प्रचार संघ कमीशन" अस संबोधलं आहे. राहुल गांधी यासंदर्भात ट्विट केलं. यामध्ये ते म्हणतात, युपीएससी म्हणजे 'यूनियन प्रचार संघ कमीशन'. भारताचं संविधान उद्ध्वस्त केलं जात आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या या ट्विटवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी त्यांचं समर्थन केलंय तर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे. (Rahul Gandhi Criticize Manoj Soni Who Appointed As UPSC New Chairman)
हेही वाचा: शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या
कोण आहेत युपीएससीचे नवे चेअरमन मनोज सोनी?
मनोज सोनी यांची ५ एप्रिल रोजी युपीएससीच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्यांनी दोन विद्यापीठांमध्ये कुलगुरु म्हणून काम पाहिलं आहे. मनोज सोनी यांनी राज्यशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली आहे. मनोज सोनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ असल्यानं ते स्वामीनारायण पंथात सामील झाले होते. या काळात त्यांनी अपूर्वानंद हे नावही धारण केलं होतं. पण कालांतरानं ते पुन्हा ऐहिक जीवनात कार्यरत झाले.
हेही वाचा: आनंद महिंद्रा यांनी आदित्य ठाकरे यांचे केले कौतुक, म्हणाले...
सोनी यांच्या नावाला आक्षेप का?
आत्तापर्यंत युपीएससीच्या चेअरमनपदी प्रख्यात उच्चविद्याभुषित व्यक्तीची नियुक्ती केली जायची. ज्यांचं अॅकॅडमिक करिअर हे उच्चस्तरीय असायचं. विशेषतः या व्यक्ती प्रशासकीय अधिकारी असायच्या. पण यंदा अशा व्यक्तीची नियुक्ती करण्याऐवजी संघविचाराच्या व्यक्तीची नियुक्ती झाल्यानं याला काँग्रेसनं विरोध दर्शवला आहे.
Web Title: Rahul Gandhi Criticize Manoj Soni Who Appointed As Upsc New Chairman
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..