
आनंद महिंद्रा यांनी आदित्य ठाकरे यांचे केले कौतुक, म्हणाले...
मुंबई : महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी मुंबईच्या बस स्टाॅप्सचे (बस थांबे) कायाकल्प केल्याबद्दल राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले आहे. महिंद्रा हे आपल्या भूमिकांसाठी ओळखले जातात. चांगलं काम करणाऱ्यांचे कौतुक ते नेहमी करत असतात. महिंद्रा यांनी केलेल्या कौतुकाबद्दल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी त्यांचे आभार मानले आहे. देशाची आर्थिक राजधानीचे बस थांब्यांचे चित्र पूर्णपणे बदलवल्याबद्दल आनंद महिंद्रा यांनी ठाकरे यांच्याबरोबरच बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांचीही प्रशंसा केली आहे. (Anand Mahindra Admire Aaditya Thackeray For Transforming Bus Stops Of Mumbai)
हेही वाचा: पुतीन यांना मोठा झटका; युक्रेनचा दावा ठरला खरा,युद्धात रशियन जनरलचा मृत्यू
आनंद महिंद्रा हे ट्विट करुन म्हणाले, शेवटी मुंबईत जागतिकस्तराचे बस स्टाॅप असतील. एक्सरसाईझ बार आणि थंड हिरवे छत यासारखे नावीन्यपूर्ण गुणवैशिष्ट्ये पाहणे खूप चांगलं वाटत आहे. वाह ! आदित्य ठाकरे, इकबालसिंह चहल.'
हेही वाचा: कोल्हापूरचा निकाल महाविकास आघाडीच्या एकजूटीचा विजय ;आदित्य ठाकरे
महिंद्रा यांचे आदित्य ठाकरेंनी मानले आभार
या नंतर आदित्य ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे आभार मानले. ट्विटमध्ये आदित्य म्हणतात, धन्यवाद आनंद महिंद्राजी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आरामदायी करणे ही त्यामागील कल्पना आहे. तसेच सर्वोत्तम सौंदर्य डिझाईन आपल्या शहरासाठी आणणे. त्यामुळे आम्ही एसी इलेक्ट्रिक बसची वारंवारिता वाढवली आहे. दुसरीकडे आम्ही आमचे बस स्टाॅप्स नागरिकांसाठी सर्वोत्तम असतील याकडे लक्ष ठेवत आहोत.
Web Title: Anand Mahindra Admire Aaditya Thackeray For Transforming Bus Stops Of Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..