esakal | चीनने जमीन बळकावल्याचं सत्य भागवत जाणतात, पण...; राहुल गांधींची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi.

सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)  यांनी चीनचा उल्लेख करत भारताने अधिक शक्तीशाली होण्याचे आवाहन केले

चीनने जमीन बळकावल्याचं सत्य भागवत जाणतात, पण...; राहुल गांधींची टीका

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव नागपूरात पार पडला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat)  यांनी चीनचा उल्लेख करत भारताने अधिक शक्तीशाली होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्य हे आहे की चीनने आपली जमीन बळकावली आहे आणि केंद्र सरकार आणि आरएसएसने हे होऊ दिलं. मोहन भागवत यांनाही हे माहित आहे, पण ते याचा सामना करण्यासाठी घाबरत आहेत, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.  

पुणेकरांच्या दुपारी झोपण्याच्या सवयीवरुन चंद्रकांत पाटलांचा टोला; दिले मोदींचे...

काय म्हणाले मोहन भागवत?

चीनने आपल्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. आपल्यासोबतच अन्य देशांशीही चीनने युद्धजन्य स्थिती निर्माण केली. पण, लडाखमध्ये भारतीय सैन्याने चीनला प्रत्युत्तर दिले. त्यामुळे चीनला जोरदार धक्का बसला आहे. आता भारताला सगळ्याच अर्थाने चीनपेक्षा मजबूत होण्याची गरज असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच आरएसएसचा विजयादशमी सोहळा मैदानात न होता सभागृहात पार पडत. यावेळी ५० जणांच्या उपस्थितीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी जनतेला संबोधित केले. करोनामुळे इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी स्वयंसेवकांमध्ये दसरा मेळावा करण्याची वेळ आपल्यावर आलीये, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यंदा संपूर्ण जगावर करोनाचे संकट आले आहे. या संकटकाळात संपूर्ण देश एक झाला आहे. सर्वांनी मिळून करोनासोबत लढा दिला आहे. सेवाभाव जो आपला समाज विसरला होता, तो पुन्हा जागृत झाला आहे, असे भागवत म्हणाले.

कटुता निर्माण होऊ नये -

२०१९मध्ये कलम ३७० हटवण्यात आले. त्याचबरोबर ९ नोव्हेंबरला न्यायालयानं राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. तो निर्णय संपूर्ण देशाने संयमाने स्वीकारला. त्याचबरोबर सीएएमुळं देशातील कोणत्याही नागरिकाला धोका नाही, असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला आहे. तसंच, देशात राहणाऱ्या लोकांमध्ये स्पर्धा असावी युद्ध नसावे. समाजात कटुता निर्माण होऊ नये, असेही ते म्हणाले आहेत.

loading image
go to top