पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त : राहुल गांधी

Rahul Gandhi Criticizes Modi Government over Rafel Deal Issue
Rahul Gandhi Criticizes Modi Government over Rafel Deal Issue

नवी दिल्ली : राफेल विमान करारावरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मोदी सरकारवर ट्विटरवरून निशाणा साधला. ते म्हणाले, की ''सरकारने करार बदलून याचे पैसे अंबानींच्या खिशात घातले. सर्वोच्च न्यायालयात मोदीजींनी आपली चूक मान्य केली'', असे म्हणत पुढे ते म्हणाले, ''पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त''.

छत्तीसगड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी काल (सोमवार) मतदान झाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी काही दिवसांत मतदान होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राफेल विमान करारावरून काँग्रेसकडून सातत्याने टीका केली जात आहे. राहुल गांधी म्हणाले, सरकारने करार बदलून याचे पैसे अंबानींच्या खिशात घातले. सर्वोच्च न्यायालयात मोदीजींनी आपली चूक मान्य केली. तसेच जाहीरनाम्यात त्यांनी वायूसेनेला कोणतीही कल्पना न देता करार बदलला आणि 30 हजार कोटी रुपये अंबानींच्या खिशात घातले. 

दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनीही राफेल करारावर मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, नि:पक्षपाती चौकशीची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com