काश्‍मीरप्रश्‍नी कोणाच्या हस्तक्षेपाची गरज नाही: राहुल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 जुलै 2017

काश्‍मीर हा आपला अंतर्गत प्रश्‍न असल्याचे माझे मत आहे. या प्रकरणी कोणीही हस्तक्षेप करण्याची गरज नाही

नवी दिल्ली - "काश्‍मीर हा भारत आहे; आणि भारत हा काश्‍मीर आहे,' असे भावनिक विधान करत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवार) "देशांतर्गत मुद्यांवर मार्ग काढण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाची गरज नसल्याची' भूमिका स्पष्ट केली.

"काश्‍मीरप्रश्‍नी चीन व पाकिस्तानशी चर्चा केली जावी, असे म्हटले जाते. मात्र काश्‍मीर हा आपला अंतर्गत प्रश्‍न असल्याचे माझे मत आहे. या प्रकरणी कोणीही हस्तक्षेप करण्याची गरज नाही,'' असे गांधी म्हणाले.

गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे जम्मु काश्‍मीर "जळत' असल्याची टीकाही केली.

Web Title: Rahul Gandhi criticizes Narendra Modi over Kashmir