esakal | 'मित्रों'वाला राफेल है, सवाल करो तो जेल है; राहुल गांधींची PM मोदींवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

'मित्रों'वाला राफेल है, सवाल करो तो जेल है; राहुल गांधींची PM मोदींवर टीका

'मित्रों'वाला राफेल है, सवाल करो तो जेल है; राहुल गांधींची PM मोदींवर टीका

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून थंड झालेला राफेलचा आर्थिक गैरव्यवहाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस पहिल्यापासूनच केंद्र सरकारवर टीका करत आहे. या राफेलच्या मुद्यावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी राफेलसोबत तेलाच्या वाढत्या किंमतीवरुनही मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय

राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे आणि लिहलंय...

रिकामी जागा भरा...

मित्रांसाठी राफेल आहे,

टॅक्स वसूली-महाग तेल आहे,

PSU-PSB ची आंधळी सेल आहे,

प्रश्न केला तर जेल आहे,

मोदी सरकार........ आहे.

हेही वाचा: ट्विटरने नियम पाळले नाहीत, केंद्राची न्यायालयात माहिती

याआधी राफेल प्रकरणात फ्रान्समध्ये चौकशी सुरू झाल्यानंतर मोदी सरकारविरोधात पुन्हा एकदा ‘राफेल’चे हत्यार हाती लागल्याने आक्रमक झालेल्या राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना संयुक्त संसदीय समितीद्वारे (जेपीसी) गैरव्यवहाराच्या चौकशीला सरकार का तयार नाही, असा खोचक सवाल केला होता.

राहुल गांधींनी या प्रकरणात ‘ट्विट’ करताना, त्यामागची संभाव्य कारणे सांगणारे पर्याय मांडून केंद्र सरकारची खिल्लीही उडविली होती. राफेल प्रकरणात केंद्र सरकार ‘जेपीसी’द्वारे चौकशीला का तयार नाही? असा प्रश्न राहुल गांधींनी केला असून त्यावर अपराधीपणाची भावना, मित्रांचा बचाव करणे, ‘जेपीसी’ला राज्यसभेची उमेदवारी नको असणे आणि वरील पैकी सर्व पर्याय योग्य आहेत, असे चार खोचक पर्यायही दिले होते. काल राहुल गांधींनी राफेल प्रकरणात सरकारव प्रहार करताना चोर की दाढीमें.... असे ‘ट्विट’ करून चिमटा काढला होता.

loading image