'राहुल गांधींनी नैतिकतेच्या मर्यादा ओलांडल्या'

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करणारे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नैतिकतेच्या मर्यादा ओलांडल्या असल्याची टीका केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करणारे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नैतिकतेच्या मर्यादा ओलांडल्या असल्याची टीका केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसाद म्हणाले, "राहुल गांधी निर्लज्ज पद्धतीने मर्यादा ओलांडत अहोत. ते खोटे बोलत आहे. त्यांचे सरकार दहा वर्षे भ्रष्टाचाराच्या चिखलात रूतले होते. कॉंग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष 2 जी आणि कोळसा गैरव्यवहार प्रकरणात होते. मात्र त्यांनी त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. इथले शेतकरी आत्महत्या करत होते. मात्र देशाबाहेर असलेला काळा पैसा परत आणण्यासाठी त्यांनी काहीही प्रयत्न केले नाही. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काळा पैसा परत आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र राहुल गांधी त्रस्त आहेत. कारण कॉंग्रेस भ्रष्ट व्यक्तींचा बचाव करत आहे. त्यामुळेच ते काळा पैशाला उघडणपणे विरोध करू शकत नाहीत.'

गोवा येथील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी "नोटाबंदीचे नाटक हे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरुद्धचा लढा नसून हा गरीब आणि प्रामाणिक लोकांवर हल्ला आहे', असे म्हणत नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली.

Web Title: Rahul Gandhi is crossing limits of dignitiy