Election Commission rejects Rahul Gandhi’s vote theft allegations, gives 7 days ultimatum to submit affidavit : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपाला आज निवडणूक आयोगाने प्रत्यूत्तर दिलं आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच राहुल गांधी यांना शपथपत्र सादर करण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटमही दिला.