

Rahul Gandhi
esakal
Rahul Gandhi reaction: निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात विरोधी पक्षांची इंडिया आघाडी सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरली असून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा या आंदोलनाचे नेतृत्व केले. जनपथ ते जंतर-मंतर असा विरोधी पक्षांच्या खासदारांचा सुमारे तीन तासांचा मोर्चा काढण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि इतर प्रमुख विरोधी नेत्यांना ताब्यात घेतले. काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली.