Rahul Gandhi
Rahul GandhiSakal

Rahul Gandhi: राहुल गांधींना दिलासा, मानहानीच्या केसमध्ये बंगळूरु कोर्टाने दिला जामीन

Congress Rahul Gandhi Bail : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या केसमध्ये बंगळूरुच्या स्पेशल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. हे प्रकरण मागच्या विधानसभा निवडणुकांमधलं आहे. तेव्हा राहुल गांधींनी तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला होता. त्यानंतर राहुल गांधींवर त्यांनी खटला दाखल केला होता.

या प्रकरणी भाजपचे वकील विनोद यांनी म्हटलं की, २०२३च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक जाहिरात प्रकाशित केली होती. ज्यात भाजप ट्रबलमेकर सरकार आहे, असं म्हटलं होतं. हा खोटा आरोप होता. आरोपींपैकी दोघांना जामीन मिळाला आहे. याप्रकरणी राहुल गांधींनी स्वतः हजर होण्यापासून मुभा मागितली होती.

Rahul Gandhi
USA vs PAK: नितीश कुमारच अमेरिकेचे इम्पॅक्ट प्लेअर! पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या चेंडूवर ठोकला चौकार, विरूनेही घेतली मज्जा

या प्रकरणी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह मुख्यमंत्री सिद्धरामैया हेसुद्धा आरोपी आहेत. परंतु कोर्टाने दोघांनीही जामीन दिलेला आहे. कर्नाटक भाजपने काँग्रेसवर आरोप करत वर्तमानपत्रांमधून खोटो आरोप केल्याचा आरोप केला होता. शिवाय राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ती जाहिरात शेअर केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com