USA vs PAK: नितीश कुमारच अमेरिकेचे इम्पॅक्ट प्लेअर! पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या चेंडूवर ठोकला चौकार, विरूनेही घेतली मज्जा

T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला पराभूत करत मोठा उलटफेर केला. यादरम्यान नितीश कुमर हे नाव चांगलेच चर्चेत राहिले.
Nitish Kumar key role for USA to beat Pakistan in super over at T20 World Cup 2024
Nitish Kumar key role for USA to beat Pakistan in super over at T20 World Cup 2024eSakal

Nitish Kumar: गुरुवारी (6 जून) टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अमेरिका संघाने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले आणि या स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला. अमेरिकाचा हा पाकिस्तानविरुद्धचा पहिलाच सामना होत आणि पहिलाच विजयही ठरला.

दरम्यान, अमेरिकेसारख्या नवख्या संघाकडून बलाढ्य पाकिस्तानचा पराभव झाल्याने त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. यादरम्यान, एक नाव चांगलेच चर्चेत राहिले, ते नाव म्हणजे नितीश कुमार.

या सामन्यात सुपर ओव्हर होण्यापूर्वी अमेरिकेला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज होती. यावेळी हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर 30 वर्षांच्या नितीश कुमारने चौकार ठोकला. त्यामुळे अमेरिकेने हा सामना बरोबरीत रोखत सुपर ओव्हरमध्ये नेला.

त्यामुळे नितीश चांगलाच चर्चेत आला. त्याने 14 चेंडूत नाबाद 14 धावा केल्या. दरम्यान, त्याचं नाव भारतातील राजकीय नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी जुळत असल्याने त्याची आणखीच जास्त चर्चा होत आहे.

Nitish Kumar key role for USA to beat Pakistan in super over at T20 World Cup 2024
T20 World Cup: सुपर ओव्हरचा थरार अन् पाकिस्तानचा पराभव, अमेरिकेनं असा केला विजयाचा जल्लोष; पाहा Video

खरंतर नितीश कुमार हे नाव भारतीयांसाठी नवे नाही. गेल्या काही दिवसापासून तर हे नाव चांगलेच गाजत आहे, याला कारण म्हणजे लोकसभा निवडणूक 2024.

भारतीय जनता पक्षाच्या 240 जागा निवडून आल्याने बहुमतासाठी आता त्यांना इतर पक्षाच्या भूमिकेवरही अवलंबून राहावे लागणार आहे. यामध्ये जनता दल पक्षाचाही समावेश आहे. या पक्षाचे नेते नितीश कुमार असल्याने त्यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे.

यावरूनच विरेंद्र सेहवागनेही अमेरिका-पाकिस्तान सामन्यापूर्वी मजा घेतली होती. त्याने सामन्यापूर्वी क्रिकबझच्या शो मध्ये अमेरिका संघाबद्दल चर्चा सुरू असताना क्रिकेटपटू नितीश कुमारचे नाव येताच हसत म्हटले की सध्याच्या दिवसात हे सर्वात महत्त्वपूर्ण नाव आहे.

यानंतर शोचा होस्ट गौरव कपूर म्हणाला, कोणी असो वा नसो, प्लेइंग-11 मध्ये हे नाव नक्कीच असेल, याच्याशिवाय संघ बनू शकत नाही. त्यावर सेहवागही हसू लागला.

कोण आहे अमेरिकेचा अष्टपैलू नितीश कुमार

दरम्यान, 21 मे 1994 साली कॅनडामधील स्कारबोरो येथे नितीश कुमारचा जन्म झाला. त्याचे वडील टोरोंटोमध्ये क्रिकेट खेळायचे, त्यामुळे त्यालाही क्रिकेटची आवड निर्माण झाली. त्याने लहान वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकले.

अमेरिककडून क्रिकेट खेळण्यापूर्वी तो कॅनडाच्या संघाकडून क्रिकेट खेळला आहे. त्याने 2009 मध्ये केनियाविरुद्ध आयसीसीच्या इंटरकॉन्टिनेंटल कप खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्याने 2010 मध्ये कॅनडासाठी अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यावेळी त्याचे वय अवघे 15 वर्षे होते. तो वनडेत पदार्पण करणारा दुसऱ्या क्रमांकाचा युवा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे 2011 च्या वनडे वर्ल्ड कपमध्येही तो कॅनडाकडून खेळला होता.

त्याने २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो 2019 पर्यंत कॅनडाकडून खेळला. यादरम्यान तो 16 वनडे आणि 18 टी20 सामने खेळला.

Nitish Kumar key role for USA to beat Pakistan in super over at T20 World Cup 2024
Saurabh Netravalkar: पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये धूळ चारणाारा सौरभ मुंबईतून कसा पोहचला अमेरिकेत? जाणून घ्या प्रवास

तथापि, 2019 नंतर तो अमेरिकेला आला. तिथेही त्याने क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आणि अमेरिकेकडून खेळण्यासाठी आवश्यक ती पात्रताही मिळवली. तो एप्रिल 2024 मध्ये अमेरिकेसाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. हा सामनाही तो कॅनडाविरुद्ध खेळला. दरम्यान, त्याचे आता टी20 वर्ल्ड कप 2024 साठीही अमेरिका संघात निवड झाली आहे.

अमेरिकेचा विजय

दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 159 धावा केल्या. त्यानंतर 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेनेही 20 षटकात 3 बाद 159 धावाच केल्या. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये सामना गेला.

सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने प्रथम फलंदाजी करताना 18 धावा केल्या, पण पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये 1 बाद 13 धावाच करता आल्या. त्यामुळे अमेरिकेने विजय मिळवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com