काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत तरीही राहुल गांधीच घेतात सर्व निर्णय - सिब्बल

गांधी कुटुंबानं आता अध्यक्षपद सोडावं आणि इतरांना संधी द्यावी अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
kapil sibbal and rahul gandhi.jpg
kapil sibbal and rahul gandhi.jpg

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दारुण पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वावरुन सध्या खलबतं सुरु आहेत. त्यातच काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी पक्षाला घरचा आहे दिला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) हे पक्षाचे अध्यक्ष नाहीत पण तरीही सर्व निर्णय घेतात, असं त्यांनी म्हटलं आहे. सिब्बल यांनी कायमच अध्यक्षपदासाठी गांधी कुटुंबियांना विरोध दर्शवला आहे. (Rahul Gandhi is not president of Congress but taking all decisions Sibal)

kapil sibbal and rahul gandhi.jpg
'आप'ला 'स्पेशल' ट्रिटमेंट; उद्या शपथविधी आज सगळे निर्बंध हटवले

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक दिल्लीत पार पडली. यावेळी पक्षाचे अनेक बडे नेते उपस्थित होते. या बैठकीत सोनिया गांधी यांनीच पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारावीत असा निर्णय झाला, पण सर्व काँग्रेसजन या निर्णयामुळं समाधानी नाहीत. याबाबत इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कपिल सिब्बल म्हणाले, आता वेळ आली आहे की, काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन गांधी कुटुंबियांनी दूर व्हावं आणि बिगर गांधींना संधी द्यावी. यासाठी गांधी कुटुंबाच्या सदस्यांनी स्वतःहून असा निर्णय घ्यावा. कारण त्यांनीच नेमणूक केलेले काँग्रेस नेते कधीही त्यांना पदावरुन दूर होण्याबाबत सांगणार नाहीत.

kapil sibbal and rahul gandhi.jpg
कर्नाटकात हिजाब वाद सुरुच; विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार!

पण जेव्हा सिब्बल यांना विचारण्यात आलं की, राहुल गांधींकडे पुन्हा पक्षाची धुरा सोपवण्याची मागणी वाढू लागली आहे. यावर सिब्बल म्हणाले, राहुल गांधी सध्या जरी काँग्रेसचे अध्यक्ष नसले तरी पक्षांसंदर्भात सर्व निर्णय तेच घेतात. आता उदाहण द्यायचं झालं तर राहुल गांधी पंजाबमध्ये गेले आणि त्यांनी पुढील मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी असतील अशी घोषणा केली. म्हणजेच पक्षाचे अध्यक्ष नसतानाही त्यांनी कुठल्या आधारे ही घोषणा केली.

पुढे सिब्बल असेही म्हणाले, सर्वांच्या काँग्रेससाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिल. सर्वांची काँग्रेस म्हणजे ज्यांना भाजप नको आहे त्यांना सर्वांना एकत्र आणणं होय. पण ही सर्वांची काँग्रेस घरच्या काँग्रेसशिवाय चालू शकणार नाही, हे एक आव्हानच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com