CM हेमंत बिस्वा सरमांचं राहुल गांधींबाबत आणखी एक वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...

Rahul Gandhi CEO
Rahul Gandhi CEOSakal

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली असतानाच आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना असे वक्तव्य त्यांनी केलंय. (Himanta Biswa Sarma)

Rahul Gandhi CEO
केनियाच्या माजी PMच्या मुलीला भारतात मिळाली दृष्टी; मोदींची भेट घेत म्हणाले...

इतकंच नव्हे तर ते म्हणालेत की, काँग्रेसने एक इकोसिस्टम विकसित केलीये आणि या इकोसिस्टममधील लोक भारताविरोधातल्या गोष्टी सहन करू शकतात, पण ते या गांधींविरुद्ध काहीही सहन करणार नाहीत. आज त्यांचं कोणी ऐकत नाही. मात्र, लोकांनी देशाशी एकनिष्ठ असले पाहिजे, विशिष्ट कुटुंबाशी नाही, असंही ते म्हणाले.

याआधीही गेल्या दोन दिवसांत त्यांनी राहुल गांधींविरोधात तसेच गांधी कुटुंबियांविरोधात अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुंबई युथ काँग्रेसने आता आंदोलन करायचं ठरवलं आहे. मुंबई काँग्रेस कार्यालय इथे हे आंदोलन होणार असून मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.

Rahul Gandhi CEO
सलमान खानच्या बिग बॉस घराला लागली आग

'राजीव तुमचे वडील आहेत, याचा काय पुरावा?'

याआधी एका सभेत हेमंत सरमा म्हणाले होते की, राहुल गांधी तुम्ही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहात. आम्ही तुमच्याकडे तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा कधी मागितला आहे का? लष्कराने जर सांगितलं आहे की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला आहे तर तो त्यांनी केलाच आहे. त्याचे पुरावे कसले मागता? लष्करात सेवा बजावलेल्या उत्तराखंडच्या सुपुत्रावर तुमचा विश्वास नाही का, असा सवालही त्यांनी केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com