Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पत्राने कोंडी फुटली; झारखंडमध्ये सरकार-विद्यार्थी आंदोलकांमध्ये आज निर्णायक चर्चा

Rahul Gandhi Letter Opens Talks With Jharkhand Student Protesters: राहुल गांधींच्या पत्रानंतर झारखंड सरकार चर्चेला तयार; भरती परीक्षांतील गैरप्रकार, सीबीआय चौकशी व सर्व परीक्षा रद्द करण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आज स्टेट गेस्ट हाऊसमध्ये निर्णायक चर्चा
rahul gandhi

rahul gandhi

sakal

Updated on

-उज्ज्वलकुमार

पाटणा/रांची : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लिहिलेल्या पत्रानंतर, राज्य सरकार आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार झाले आहे. आता राज्य सरकार आणि विद्यार्थी आंदोलकांच्या प्रतिनिधींमध्ये सोमवारी (ता. १७) स्टेट गेस्ट हाऊसमध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान, सरकार मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत विद्यार्थी संघटनांनी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या पुतळ्यांचे दहन केले होते. तसेच, २० ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com