Rahul Gandhi Disqualification : "गांधी किसीसे माफी नहीं मांगता"

सावरकरांच्या नावाचा त्यांनी पुनरुच्चार केल्याने आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi Latest Newsesakal

लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण माफी मागून मिटवता आलं असतं, असं सांगितलं जात आहे. मात्र याबद्दलच आता राहुल गांधींनी एक विधान केलं आहे.

राहुल गांंधी आणि त्यांची खासदारकी या मुद्द्यावरुन सध्या देशातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपा आणि काँग्रेस दोन्हीही पक्ष या मुद्द्यावरुन आंदोलन करत असतानाच राहुल गांधींनी याविषयी पत्रकार परिषद घेतली आहे. माझं नाव सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत, असं राहुल गांधी आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi : वातावरण विरोधात आहे, रणनीती काय असेल? राहुल गांधींनी पुन्हा ठणकावून सांगितलं....
Rahul Gandhi Latest News
Rahul Gandhi : गांधी भक्तांनी मोदींच्या अंधभक्तांप्रमाणे वागू नये; 'सामना'तून काँग्रेसलाच सुनावलं

त्यांच्या या विधानामुळे आता आणखी नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या आधीही राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी चौकीदार चोर आहे, अशा घोषणा दिल्या होत्या.

त्यानंतर त्यांनी तीन वेळा सर्वोच्च न्यायालयामध्ये माफीनामा सादर केला होता. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधी(Rahul Gandhi) यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी माफी मागून केस संपवली होती.

मात्र यावेळी राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही. माफी मागायला नकार देत त्यांनी मी सावरकर नाही, मी गांधी आहे, गांधी कोणाची माफी मागत नाही, असं विधान केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com