जिथे कुठे सत्य, तिथे बापूजी अजूनही जिवंत : राहुल गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi
जिथे कुठे सत्य, तिथे बापूजी अजूनही जिवंत : राहुल गांधी

जिथे कुठे सत्य, तिथे बापूजी अजूनही जिवंत : राहुल गांधी

नवी दिल्ली : ‘हिंदुत्त्ववाद्यांना वाटते की राष्ट्रपिता गांधीजी आता आपल्यात नाहीत, पण जिथे कुठे सत्य आहे, तिथे गांधीजी जिवंत आहेत,’ असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज म्हणाले. महात्मा गांधीजींच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त राहुल गांधी यांनी राजघाट येथे जाऊन त्यांना आज आदरांजली वाहिली.

महात्मा गांधी म्हणजे हिंदू आणि गोडसे म्हणजे हिंदुत्ववाद अशा शब्दांत त्यांनी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून संघ, भाजपविरोधात आक्रमक टिका करत आहेत. त्या मालिकेत त्यांनी #GandhiForever हा हॅशटॅग वापरत गांधीजींना आदरांजली वाहिली. गांधीजींचे आवडते भजन रघुपती राघव राजाराम आणि गांधीजींचा चष्मा असलेले चित्र जोडून त्यांनी खोचक ट्विट केले. ते म्हणाले की, ‘एका हिंदुत्त्ववाद्याने गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली.

हेही वाचा: Bigg Boss 15 Winner: तेजस्वी प्रकाश विजेती, प्रतिक सहेजपाल उपविजेता

सर्व हिंदुत्त्ववाद्यांना वाटते की गांधीजी जिवंत नाहीत. मात्र, जिथे कुठे सत्य असेल, तिथे बापू अजूनही जिवंत आहेत.’ आपल्या ट्विटर हँडलवर राहुल यांनी गांधीजींचे एक वाक्यही उद्‌धृत केले - ‘निराश झाल्यावर मी आजपर्यंतच्या इतिहासात सत्य आणि प्रेम यांचाच विजय झाला आहे, याचे स्मरण करतो. जगात अनेक क्रूर, खूनी होऊन गेले आणि ते अजिंक्य असल्याचा भासही काही काळ झाला, मात्र अखेरीस त्यांचा नाश होतोच. याचा नेहमी विचार करा.’ काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही अहिंसेबाबतचे विचार मांडून गांधीजींना आदरांजली अर्पण केली.

ज्योत मालविल्यावरून टीकास्त्र

काँग्रेसनेही गोडसेवादी विरुद्ध गांधीवादी असे ट्विट करून इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत मालविण्याचा निर्णय म्हणजे इतिहास मिटविण्याचा गोडसेवाद्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. जेव्हा गोडसे देशाचा इतिहास नष्ट करण्यासाठी येईल तेव्हा गांधी आपल्या हाताने इतिहास सावरतील, असे काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे. इंडिया गेटवरील अमर जवान स्मारक आणि मालविलेल्या ज्योतीचे छायाचित्र, सत्ताधारी भाजपच्या उलट्या निवडणूक चिन्हासह या ट्विटमध्ये दर्शविण्यात आले आहे.

अमर जवान ज्योत मालवून केंद्राने जनतेच्या भावनांशी खेळ केला आहे. काँग्रेस आता ही अमर जवान ज्योत छत्तीसगडला आणणार असून त्यासाठी रायपूरमध्ये युद्धस्मारक उभारले जाणार आहे. तीन फेब्रुवारीला राहुल गांधी यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन होईल.

- भूपेश बघेल, मुख्यमंत्री, छत्तीसगड

Web Title: Rahul Gandhi Mahatma Gandhi Death Anniversary

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top