Rahul Gandhi Begins Matdar Hakk Yatra from Sasaram : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू केलीये. मतदार यादीतील अनियमिततेविरोधात सासाराम येथून या प्रवासाला सुरुवात झाली आहे. तब्बल १६ दिवस चालणाऱ्या या यात्रेत बिहारमधील २५ जिल्ह्यांचा समावेश असेल. या प्रवासात तेजस्वी यादव, डाव्या पक्षांचे नेते आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादवही सहभागी झाले आहेत.