राहुल यांचे राजकारण लोकशाहीविरोधी: अमित शहा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची काम करण्याची पद्धत लोकशाहीविरोधात आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात वारंवार अडथळे आणले गेले

नवी दिल्ली - ""कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची काम करण्याची पद्धत लोकशाहीविरोधात आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात वारंवार अडथळे आणले गेले,'' अशी टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) केली.

भाजपच्या संसदीय बैठकीनंतर बोलताना संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राजकारण करण्याची राहुल यांची पद्धत लोकशाहीविरोधात आहे. त्यामुळेच पंतप्रधानांच्या भाषणात अशा प्रकारचे अडथळे आणले गेल्याचे टीका अमित शहा यांनी बैठकीत केली. राफेल विमानाच्या कराराची माहिती उघड करण्याची मागणी कॉंग्रेस करीत आहे. यावर बोलतान अनंतकुमार यांनी सांगितले की, या करारातील प्रमुख मुद्दे यापूर्वीच उघड केले आहे. देशाच्या सुरक्षेच्या हितासाठा सर्व तपशील देता येणार नाही. शहा यांनीही असेच मत व्यक्त केल्याचे ते म्हणाले.

Web Title: rahul gandhi narendra modi amit shah bjp