नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार: "राहुल गांधी 10 कोटी रु. जमा करा'

पीटीआय
सोमवार, 19 मार्च 2018

नोव्हेंबर 2010 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या दी यंग इंडियन या कंपनीने नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची मालकी असलेल्या असोसिएटेड जर्नल लिमिटेड (एजेएल) या कंपनीचे जवळजवळ सर्व भाग (शेअरहोल्डिंग) खरेदी केले होते. दी यंग इंडियन ही कंपनी 50 लाखांच्या भांडवलासहित सुरु करण्यात आल्याचे दाखविण्यात आले होते

नवी दिल्ली - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व त्यांच्या माता सोनिया गांधी यांना आज (सोमवार) दिल्ली उच्च न्यायालयाने 10 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले.

"नॅशनल हेराल्ड' गैरव्यवहारप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाच्या एस. रवींद्र भट आणि ए. के. चावला या न्यायाधीशांच्या खंडपीठाने यासंदर्भातील निर्णय सुनावला.
नोव्हेंबर 2010 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या दी यंग इंडियन या कंपनीने नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची मालकी असलेल्या असोसिएटेड जर्नल लिमिटेड (एजेएल) या कंपनीचे जवळजवळ सर्व भाग (शेअरहोल्डिंग) खरेदी केले होते. दी यंग इंडियन ही कंपनी 50 लाखांच्या भांडवलासहित सुरु करण्यात आल्याचे दाखविण्यात आले होते.

गांधी कुटूंबीयांनी यंग इंडियनकडे एजेएलचे भाग हस्तांतरित करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. दी यंग इंडियनमध्ये राहुल व सोनिया हे प्रमुख हिस्सेदार आहेत.

Web Title: rahul gandhi national herald scam sonia gandhi