Rahul Gandhi and opposition MPs protesting near Prime Minister Narendra Modi's residence
esakal
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईचे पडसाद आता थेट देशाच्या राजकारणात उमटू लागले आहेत. या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रियंका गांधी वाड्रा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पवन खेरा, दीपेंद्र हुड्डा, अमरिंदर सिंह राजा वडिंग, डी. के. शिवकुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले.