
नवी दिल्ली: लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर' वर मंगळवारीही चर्चा सुरू आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पहलगामच्या गुन्हेगारांना सेनेने ऑपरेशन महादेवमध्ये ठोकून काढले, असं म्हणत शाहांनी ठार झालेले दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा पुरावा मिळाल्याची माहितीही सभागृहात दिली. त्यानंतर राहुल गांधींनी सरकारवर प्रश्न उपस्थित करत मोदींनाही धारेवर धरले.