
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोठा बॉम्ब फोडला. खरंतर राहुल गांधींचा मुद्दा हा फक्त मतचोरीचा नव्हता तर, मतचोरीच्या आडून भाजप सरकार देशातील लोकशाहीवर आणि संविधानावर करत असलेल्या हल्ल्यावर त्यांनी भाष्य केलं. शिवाय, मतचोरीच्या मुद्द्यात थेट केंद्रीय निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा ठपकाही राहुल गांधींनी पत्रकारांसमोर मांडला. त्यामुळे गुरुवारच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय झालं? आणि त्यातून राहुल गांधींना नेमकं काय म्हणायचंय सविस्तर समजून घेऊया.