esakal | PM मोदींनी चीनसमोर टेकले गुडघे ; भ्याडपणे दिली भारतमातेची जमीन; राहुल गांधींचा घणाघात
sakal

बोलून बातमी शोधा

modi rahul

काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भारत-चीन प्रश्नावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

PM मोदींनी चीनसमोर टेकले गुडघे ; भ्याडपणे दिली भारतमातेची जमीन; राहुल गांधींचा घणाघात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत भारत-चीन प्रश्नावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भारतमातेचा तुकडा चीनला देऊन टाकला आहे, असा आरोप त्यांनी मोदी सरकारवर केला आहे.

राहुल गांधी यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले की, काल संसदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-चीन प्रश्नाबाबत माहिती दिली. मात्र, ती अर्धवट होती. वास्तव असं आहे की, भारताची जमीन लडाख भागात फिंगर 4 पर्यंत आहे. मात्र, आता चीनने त्यावर ताबा मिळवला असून तो ताबा घ्यायला संमती पंतप्रधान मोदींनी दिली आहे. मोदी हे चीनसमोर झुकले असून त्यांना चीनसमोर धैर्याची भुमिका घेता आलेली नाहीये. या देशातील सैन्य चीनसमोर धैर्याने उभं रहायला तयार असताना पंतप्रधान मोदी मात्र घाबरटपणे माघार घेऊन चीनसमोर झुकले आहेत. त्यांनी ही माहिती काल स्वत:हूनच संसदेत द्यायला हवी होती मात्र, त्यांनी एकप्रकारे भारतीय सैन्याचा आणि देशातील जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी  केला आहे. 

हेही वाचा - Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल शंभरीला पाच कमी, डिझेलसोबत शतकी भागीदारी

पुढे ते म्हणाले की, काल संरक्षण मंत्र्यांनी दोन्ही सभगृहात पूर्व लडाखबाबत माहिती दिली. मात्र, आपले सैन्य फिंगर 4 वरुन फिंगर 3 कडे जाताना दिसत आहे. मात्र, फिंगर 4 ही आपली जमीन आहे. मात्र आपण ती सोडून फिंगर 3 कडे जात आहोत. पंतप्रधान मोदींनी आपली जमीन चीनला का दिली आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. 

मोदी हे घाबरट आहेत जे चीनसमोर धैर्याने उभे राहू शकत नाहीयेत. ते आपल्या सैन्याच्या त्यागाचा आणि विश्वासाचा घात करत आहेत. भारतात कुणालाही असं करण्याची परवानगी असू नये. असी घणाघाती टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे. 

loading image