राहुल लागले कामाला

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

नवी दिल्ली : नववर्षाच्या आठवडाभराच्या सुट्या आटोपून मायदेशी परतलेले कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपल्या मातोश्री सोनिया गांधी आणि बहीण प्रियांका वद्रा यांची भेट घेऊन कामाला सुरवात केली.

पंजाबमधील कॉंग्रेस नेत्यांनी आज राहुल यांची भेट घेऊन उमदेवार यादीबाबत त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी पंजाब कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंगदेखील उपस्थित होते.

भाजपचे माजी नेते नवज्योतसिंग सिद्धू हे लवकरच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, अमृतसर पूर्वमधून ते निवडणूक लढवू शकतात किंवा हीच जागा त्यांच्या पत्नीलाही दिली जाऊ शकते, असे अमरिंदर यांनी नमूद केले. मागील दहा वर्षांपासून पंजाबच्या सत्तेपासून दुरावलेल्या कॉंग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी अमरिंदरसिंग यांना कडवट संघर्ष करावा लागणार आहे.

Web Title: rahul gandhi returns