esakal | राहुल गांधींच्या भेटीनंतर राऊतांची तीव्र प्रतिक्रिया; म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

राहुल गांधींच्या भेटीनंतर राऊतांची तीव्र प्रतिक्रिया; म्हणाले...

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेनंतर देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात चार शेतकऱ्यांसह आठ लोकांचा मृत्यू झाला. याच घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना भेटायला जात असताना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आली. या संपुर्ण पार्श्वभुमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधींची भेट घेतली. लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेत प्रियांका गांधी यांना काल अटक करण्यात आली असून, आज त्यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या या अटकेवर देशभरातून टीका होत असताना, संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली.

राहूल गांधी यांना भेटल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. देशातील लोकशाही राहीली नाही असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. लोकशाही भस्म झाली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी झाली आहे. तसेच राहूल गांधीशी झालेल्या भेटीत देशातील सद्यस्थितीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात FIR; शांतता भंग केल्याचा आरोप

दरम्यान, संजय राऊत यांनी भेटीच्या आधी पत्राकारांशी संवाद साधताना प्रियांका गांधींची हिंमत विरोधकांना उर्जा देणारी असल्याचे सांगितले. तसेच ज्या पद्धतिने सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधकांचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतोय तो योग्य नाही असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. लखीमपूर प्रकरणातील आरोपी मुक्त आहेत आणि प्रियांका गांधी जेलमध्ये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

loading image
go to top