
Rahul Gandhi Accuses Election Commissioner Gyanesh Kumar of Protecting Vote Thieves
Esakal
Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर असे आरोप केले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मत चोरी करणाऱ्यांचं संरक्षण करतायत. मी हे पुराव्यासह बोलतोय असंही राहुल गांधी म्हणाले. आज मतचोरीबाबत हायड्रोजन बॉम्ब फुटणार असल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. धक्कादायक खुलासे करण्याआधी राहुल गांधी यांनी अनेक गंभीर आरोप केलेत. यावेळी त्यांनी प्रेझेंटेशन करताना काही आकडेवारीही जाहीर केली. यात एकाच मतदाराकडून १२ पेक्षा जास्त मतदार डिलिट केल्याचा दावा त्यांनी केला. तर पहाटेच्या वेळीही मतदार डिलिट करण्यात आल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं. डिलिट केलेल्यांमध्ये काँग्रेसच्या मतदारांचाच समावेश असल्याचं राहुल गांधी म्हणाले.