
पुण्यात कोथरूड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी आणि एका अधिकाऱ्यानं चौकशीच्या नावाखाली ३ तरुणींचा छळ केल्याचा आऱोप होत आहे. यावरून आता पुणे पोलीस पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एक महिला पतीच्या छळाला कंटाळून पुण्यात आली होती. महिला आश्रमात दाखल होण्याआधी एका रात्रीसाठी ३ तरुणींकडे ती थांबली. तिला आश्रय देणाऱ्या तरुणींना महिलेच्या निवृत्त पोलीस अधिकारी असलेल्या सासऱ्यानं रात्रीत यंत्रणा फिरवून त्रास दिला. राजकीय दबाव टाकून त्यांची पोलीस चौकशी करायला लावल्याचे आरोप आता करण्यात येतायत.