राहुल गांधी व मोदींमध्ये डील - केजरीवाल

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

राहुल यांनी सुरवातीला मोदींविरोधात आरोप करत भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचे म्हटले होते. आता काहीच बोलत नाहीत. या दोघांमध्ये नक्कीच डील झाले आहे.

नवी दिल्ली - राजकीय पक्षांचा काळा पैसा लपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात डील झाल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

राजकीय पक्षांच्या खात्यावर जमा करण्यात आलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर कोणताही कर लावण्यात येणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयावरून केजरीवाल यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

केजरीवाल म्हणाले, की नोटाबंदीच्या निर्णयानंतर राजकीय पक्षांच्या खात्यांवर झालेले सर्व व्यवहार सार्वजनिक करण्यात यावेत. पंतप्रधान मोदींची याबाबत नियत चांगली नसल्याचे यावरून दिसते. राहुल गांधी शुक्रवारी पंतप्रधान मोदींना भेटायला गेले होते. त्यानंतर राजकीय पक्षांच्या खात्यावरील रकमेबाबत घोषणा झाली आहे. राहुल यांनी सुरवातीला मोदींविरोधात आरोप करत भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याचे म्हटले होते. आता काहीच बोलत नाहीत. या दोघांमध्ये नक्कीच डील झाले आहे. राहुल यांनी मोदींविरोधातील पुरावे जनतेसमोर मांडले पाहिजेत.

Web Title: rahul gandhi should stop his deals with narendra modi says arvind kejriwal