व्हीलचेअरवरील कर मागे घ्या : गांधी

पीटीआय
मंगळवार, 4 जुलै 2017

जीएसटीनुसार ब्रेल टाइपरायटर, दिव्यांग व्यक्तीची वाहने, व्हीलचेअर तसेच साह्य ठरू शकणाऱ्या उपकरणावर पाच ते 18 टक्‍क्‍यांपर्यंत कर आकारला आहे. राहुल गांधी यांनी ट्‌विट करत सरकारच्या जीएसटी धोरणावर टीका केली आहे.

नवी दिल्ली - व्हीलचेअर तसेच ब्रेल टाइपरायटरवर आकारण्यात आलेल्या दिव्यांग करावरून मोदी सरकारची असंवेदनशीलता कळते, अशा शब्दांत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली. हा कर मागे घेण्याचीही मागणी गांधी यांनी केली आहे.

जीएसटीनुसार ब्रेल टाइपरायटर, दिव्यांग व्यक्तीची वाहने, व्हीलचेअर तसेच साह्य ठरू शकणाऱ्या उपकरणावर पाच ते 18 टक्‍क्‍यांपर्यंत कर आकारला आहे. राहुल गांधी यांनी ट्‌विट करत सरकारच्या जीएसटी धोरणावर टीका केली आहे. या करामुळे लाखो दिव्यांग व्यक्तींच्या अडचणींत वाढ होईल, असे राहुल यांनी म्हटले आहे. या धोरणामुळे समाजातील कमकुवत वर्गाबाबत सरकार किती असंवेदनशील आहे, हे कळते, असेही गांधी यांनी नमूद केले.

Web Title: Rahul Gandhi slams Centre for 'disability tax' on wheelchairs, braille typewriters