

Rahul Gandhi viral post
esakal
Rahul Gandhi latest statement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्तपासणीची (SIR) प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी नवी दिल्लीत आंदोलन केले. संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे निघालेला मोर्चा पोलिसांनी रोखल्यानंतर आकाशवाणी भवन परिसरात नेत्यांनी ठिय्या दिला. सुमारे आठ ते नऊ तास चाललेल्या आंदोलनानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते आणि समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.