rahul gandhi
sakal
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या मोर्चावरील कारवाईवरून काँग्रेसने केंद्र सरकारला पुन्हा लक्ष्य केले आहे. गृहमंत्री अमित शहा घाबरले असून विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत संसदेत येऊन विरोधकांना उत्तर देण्याचे धैर्य त्यांच्यात नाही, असा खळबळजनक आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला, तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी, अयोध्येतील राममंदिराच्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत देशाला स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान दिले.