esakal | "...वह योगी कैसा?" राहुल गांधींनी थेट साधला आदित्यनाथांवर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

"...वह योगी कैसा?" राहुल गांधींनी थेट साधला आदित्यनाथांवर निशाणा

"...वह योगी कैसा?" राहुल गांधींनी थेट साधला आदित्यनाथांवर निशाणा

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण सध्या गरम असून ते दिवसेंदिवस अधिक तापण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एकीकडे राज्याचा विकास केला असल्याचा दावा छातीठोकपणे करुन लोकांना आपल्याबाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर विरोधक योगींच्या विकासकामातील त्रुटी लोकांसमोर आणत आहेत. अलिकडेच योगी आदित्यनाथ सरकारची एक जाहिरात वादग्रस्त ठरलीये तर दुसरीकडे योगींचं 'अब्बाजान' हे वक्तव्य चर्चेचं ठरलं आहे. यासंदर्भातच आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा: 'अब्बाजान' योगींना भोवणार; मुजफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर टीका करत म्हटलंय की, जो नफ़रत करे, वह योगी कैसा! या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी थेट योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांचं सरकार हे थेट मुस्लिम-दलित अल्पसंख्यांकाच्या मुळावर उठल्याचा आरोप विरोधकांचा आहे. मुख्यमंत्री थेटपणे मुस्लिम द्वेषाचं समर्थन करतात, अशी टीका विरोधकांची आहे. राहुल गांधींच्या या टीकेला योगींच्या अलिकडील एका वक्तव्याचा संदर्भ आहे.

हेही वाचा: मोदींच्या आधी माझे बाबा पोहचले होते; रुपाणींच्या मुलीची FB पोस्ट

उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये बोलत असताना, योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. योगी आदित्यनाथ यांनी भाजप सरकारच्या काळात सर्वांना समान न्याय मिळतो हे सांगताना पुर्वी फक्त 'अब्बाजान' म्हणणाऱ्यांना रेशन मिळायचे असे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, २०१७ मध्ये मी सत्तेवर आल्यानंतरच उत्तर प्रदेशातील सार्वजनिक धान्यवितरण व्यवस्था परिणामकारक बनली. त्याआधी गरिबांसाठी राखून ठेवण्यात आलेले धान्य जे अब्बाजान म्हणायचे त्यांच्याकडून खाल्ले जायचे.

loading image
go to top